
स्थानिक भागात घरफोडया वाढले असल्याने रेकॉर्ड वरील गुन्हेगाराची प्रतिबंधक गस्त करीत असतांना मुखबिरव्दारे माहिती मिळाली असता, आरोपी नामे साहिल उर्फ माटया आंबेकर रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपुर हा सिस्टर कॉलनी फुले चौक येथे संशयास्पद स्थितीत फिरत आहे. अश्या माहीती वरून साहिल उर्फ माटया आंबेकर रा. विठ्ठल मंदिर वार्ड चंद्रपुर यास पोलिसांनी ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता खिशात ६ हजार नगदी रक्कम मिळुन आली. याबाबत सखोल विचारपुस केली असता काल रात्रो जयराज नगर शिवसाई मंदिर जवळ आरोपी साहिलचा मित्र धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडे रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपुर याचेसोबत एका घराचे ताला तोडुन ४५ हजार रू रक्कम चोरी केली व मित्र धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडेने माल १० हजार रू दिले त्यातील ४ हजार रू खर्च केले व बाकीची रक्कम मित्र धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडे याचेजवळ आहे. असे आरोपीने पंचासमक्ष सांगितले. नमुद मिळुन आलेली नगदी रककम जप्त करण्यात आली असून कि. ६ हजार रु. अप. कं २७१ / २३ कलम ४५७,३८० भादवी मधील आरोपीचे अंगझड चोरी केलेली नगदी रक्कम असा एकुण ६ हजार रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी धर्मेंद्र उर्फ धर्मा खोब्रागडे वय २७ वर्ष रा. अष्टभुजा वार्ड चंद्रपुर या शोध घेतला असता मिळुन आला नाही. सदरचा मिळुन आलेला आरोपी व मुद्देमाल पुढील तपास कामी पोलीस स्टेशन रामनगर यांचे ताब्यात आहे. सदरची कार्यवाही मा. पोलिस अधिक्षक साहेब चंद्रपुर, मा. अप्पर पोलिस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा यांचेसह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सपोनि जितेद्रं बोबडे, पो.हवा. सजंय आतकुलवार, नापोशि संतोष येलपुलवार, पोशि. रविंद्र पंधरे, कुदनसिंग बावरी, नितीन रायपुरे, प्रांजल झिलपे, गोपाल आतकुलवार, नरेश डाहुले यांनी केली.



