
बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गुरूवारपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या पुणे येथील विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती दिली. कोकण, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, नाशिकसह पुणे विभागात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.



