गडचिरोली (प्रती ) गडचिरोली जिल्ह्यात गुजरात येथून आलेल्या एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असुन ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८ वर पोहोचली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील आतापर्यंतची एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33 (तेहतीस) झालेली आहे.
नव्याने आढळलेला हा रुग्ण गडचिरोली तालुक्यातील आहे. संबंधितास संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. असे आरोग्य विभागाने कळविले आहे.काल सायंकाळी 05.00 वाजता पर्यंत एकुण पॉझिटीव्ह रुग्ण 32 असुुुन शुक्रवारला 04 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले यापैैैैकी बरे झाल्यामुळे 05 रूग्णांना दिस्चार्ज दिला आहे सध्या कोरोना सक्रिय असलेली रुग्णसंख्या 28 असुन 1980 संभावित रुग्ण आहेत.
पैकी अजून निरीक्षणाखाली असलेले 669 लोक आहेे. सर्व कोरोनाबाधित दवाखान्यातील आइसोलेशन वाार्डात आहेत. संस्थात्मक विलगीकरणात 454 घेतले
शुक्रवारला तपासणीसाठी160 नमुने घेतले एकुण 1980 नमुने तपासणी झालेले आहेत. त्यापैकी 1280 निगेटीव्ह असुुन 633 नमुने तपासणी अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यात 08 सक्रिय प्रतिबंधात्मक क्षेत्र आहेत.


