गडचिरोली,(जिमाका),दि.16*: जिल्ह्यात आज 63 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच एकुण सक्रिय बाधितांमधील आज 84 जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील एकुण सक्रिय कोरोना बाधितांचा आकडा 911 झाला. आत्तापर्यंतची एकुण कोरोना बाधित संख्या 4369 वर पोहचली आहे. यापैकी 3424 जणांनी कोरोनावर मातही केली आहे. आत्तापर्यंत जिल्हयात 34 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार जिल्हयात सद्या रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.37 टक्के आहे. सक्रिय रूग्णांची टक्केवारी 20.85 असून मृत्यूदर 0.78 टक्के आहे.
आज नवीन 63 बाधितांमध्ये गडचिरोली 18, अहेरी 2, आरमोरी 5, भामरागड 9, चामोर्शी 0, धानोरा 2, एटापल्ली 2, कोरची 12, कुरखेडा 2, मुलचेरा 3, सिरोंचा 1 व वडसा येथील 7 जणांचा समावेश आहे.
तसेच आजच्या 84 कोरोनामुक्त रूग्णांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 25, अहेरी 8, आरमोरी 0, भामरागड 1, चामोर्शी 7, धानोरा 10, एटापल्ली 10, मुलचेरा 1, सिरोंचा 2, कोरची 2, कुरखेडा 6 व वडसा येथील 12 जणांचा समावेश आहे.
गडचिरोली तालुक्यातील 18 नवीन बाधितांमध्ये गडचिरोलीतील बाधितांमध्ये फुले वार्ड येथील 1, स्नेहानगर येथील 1, सर्वोदय वार्ड येथील 2, स्थानिक 7, वीर बाबुराव शेडमाके वार्ड 1, आशिर्वाद नगर 2, कॅम्प एरिया 1, रामनगर येथील 1 व स्थानिक 7 जणांचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील 2 नवीन बाधितामध्ये स्थानिक 2 जणांचा समावेश आहे.
आरमोरी तालुक्यातील 5 नविन बाधितामध्ये स्थानिक 5 जणांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील 9 नविन बाधितामध्ये स्थानिक 9 जणांचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील 2 नविन बाधितामध्ये स्थानिक 2 जणांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील 2 नविन बाधितामध्ये स्थानिक 2 (त्यापैंकी एक पोलीस) जणांचा समावेश आहे. कोरची तालुक्यातील 12 नविन बाधितामध्ये स्थानिक 12 जणांचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यातील 2 नविन बाधितामध्ये फ्रान्सिंस चर्च मधील 1, तलेगांव येथील 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील 3 नविन बाधितामध्ये स्थानिक 3 आहेत. सिरोंचा तालुक्यातील 1 नविन बाधितामध्ये स्थानिक आहे व वडसा तालुक्यातील 7 नविन बाधितामध्ये जुनी वडसा येथील 1, स्थानिक 4, रावणवाडी येथील 1, सावंगी विल येथील 1 जणाचा समावेश आहे.
तसेच इतर जिल्ह्यातील यामध्ये 2 आहेत.


