
गडचिरोली(प्रति): जिल्हयात आज 36 जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली येथील 12, चामोर्शी येथील 23, वडसा 1 असे एकूण 36 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
तर 30 नवीन कोरोना बाधितांमध्ये
▪️गडचिरोली येथील 11 जण यामध्ये चंद्रपूर नागभीड, सावली, ब्रह्मपुरी येथून आलेले चार, एक c60 पोलीस, एक सीआरपीएफ जवान, एक जिल्हा पोलीस व चार जण रुग्णाच्या संपर्कातील तीव्र जोखमीचे कोरोना बाधित आढळून आले.
▪️आरमोरी तालुक्यातील 6 जण कोरोना बाधित आढळून आले. यापैकी सहाही कोरोना बाधिताच्या संपर्कातील रुग्ण आहेत.
▪️चामोर्शी आष्टी येथील 5 जण कोरोना बाधित आढळले. ते सर्वजण कोरोना बाधीत कुटुंबाच्या संपर्कातील आहेत.
▪️वडसा येथील 3 जण कोरोना बाधिताच्या संपर्कातील रुग्ण आहेत.
▪️अहेरी येथील विलगिकरनातील 3 कोरोना बाधित आढळून आले आहेत.
▪️कोरचीतील डोंगरगडहून आलेले 2 कोरोना बाधित आढळले आहेत.
असे आज एकूण 30 जण कोरोना बाधित आढळून आले.



