चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

खासदार बाळू भाऊ धानोरकरांना काँग्रेस तर्फे श्रद्धांजली अर्पित

घुग्घूस : महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार चंद्रपूर वणी – आर्णी लोकसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी सुरेश (बाळू) धानोरकर यांचे 30 मे रोजी दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटलमध्ये किडनीतील इन्फेक्शन मुळे दुःखद निधन झाले.
त्यांच्या अकस्मात निधनाने काँग्रेस पक्षाचे धानोरकर कुटुंबाचे कधी ही न भरणारे नुकसान झाले आहे.घुघुस शहर काँग्रेसच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने जनसंपर्क कार्यालय परिसरात श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन 03 जून रोजी सांयकाळी 07 वाजता करण्यात आले.खासदार साहेबांच्या प्रतिमेस पुष्प  अर्पण करून मेणबत्ती पेटवून व दोन मिनिट मौन बाळगून श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.याप्रसंगी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,अनुसूचित जाती विभाग माजी जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, सेवादल प्रदेश उपाध्यक्ष नारायण ठेंगणे,शमरावजी बोबडे,किशोर बोबडे,अनुसूचित जाती विभाग अध्यक्षा सौ.दिप्ती सोनटक्के,कामगार नेते सैय्यद अनवर, यांनी शोक संदेश व्यक्त करीत बाळु भाऊच्या आठवणींना उजळणी दिली.
याप्रसंगी महिला जिल्हा उपाध्यक्ष सौ.यास्मिन सैय्यद,महिला जिल्हा सचिव दुर्गा पाटील,संध्या मंडल,सुजाता सोनटक्के, काँग्रेस नेते अलीम शेख,रोशन दंतलवार,मोसीम शेख,रोहित डाकूर, अजय उपाध्ये, शहजाद शेख,सोमेश रंगारी, नुरुल सिद्दीकी,विशाल मादर,हृदय अडडूरवार,भैय्या भाई,बल्ली भाई,रफिक शेख,रोहित आरमुल्ला,कुमार रुद्रारप,सुनील पाटील,अभिषेक सपडी,दीपक पेंदोर,विजय माटला,साहिल सैय्यद, आकाश चिलका,कपील गोगला,सोनटक्के गुरुजी,हरीश कांबळे, साजिद सैय्यद, रंजित राखुंडे,अंकुश सपाटे, विशाल नागपुरे,सन्नी कुम्मरवार,अमित सावरकर,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
कार्यक्रमाचे संचालन देव भंडारी यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published.