चंद्रपुर

खबरदारी म्हणून रहेमत नगर केले सील

चंद्रपूर (का.प्र.) कोरोना च्या वाढत्या दहशतीत खबरदारी उपाय म्हणून चंद्रपुरातील नागरिक रफिक मेमन यांच्या निधनानंतर प्रशासनाने रहमतनगर पूर्णपणे सील केले असून या प्रभागाकडे जाणारे सर्व रस्तेसुद्ध सील करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने रहमानतनगर भागाचे निर्जंतुकीकरण केले आहे. प्रशासनाच्या या कार्यवाही मुळे चंद्रपूर शहरात नेमके काय सुरु आहे याबाबत प्रचंड चर्चा सुरु असून रहमत नगर येथील व्यापारी रफिक मेमन यांचे नागपूर उपचारदरम्यान सोमवारी निधन झाले होते. त्यांना कोरोना लागण झाल्याची चर्चा सर्वत्र सुरु झाली होती मात्र त्यांचा रिपोर्ट नेगेटिव्ह आल्याने सर्वांंनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान जटपुरा गेटवरील डॉ. नगराळे यांच्या खाजगी रुगालयात मेमन यांच्यावर २५ ते २७ मार्च दरम्यान उपचार करण्यात आलेहोते.

डॉ. नगराळे यांनी उपचाराची माहिती लपविल्या कारणाने महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खेरा यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाणे येथेकलम १८८ अंतर्गत काल १ एप्रिल ला गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे. रफिक मेमन यांचे निधन आणि दिल्ली येथील निजामुद्दीन मकरसमधील घटनेच्या पाश्वभूमीवर रहमतनगर सील करण्यात आले आहे. रहमतनगर कडे जाणाèया सर्व रस्त्यांवर बॅरिकेट्स लावून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागिनबाग, बिनबा गेट तसेच शांतीधाम जवळील इरई नदी कडून येणारे मार्ग बंद असून बाहेरील कोणत्याही व्यक्तीला या भागात जाण्यास मज्जाव करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.