चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

कॉन्व्हेंट शिक्षकांचे भजन आंदोलन

2 ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग व महाराष्ट्र राज्य शिक्षक पालक एकता मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी पालकांच्या समस्या कडे सरकारचे लक्ष वेधण्याकरिता भजन आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या आंदोलनात विविध संघटनांनी आपला पाठिंबा जाहीर केला. त्यात आम आदमी पार्टी ,जनविकास सेना, शिक्षक भारती, विदर्भ राज्यआंदोलन समितीने आपला पाठिंबा दर्शविला.
प्रायव्हेट इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रायव्हेट कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सरकारने पूर्णवेतन देण्याकरिता MEPS 1981 हा कायदा अस्तित्वात आणला. परंतु संस्थाचालक शिक्षक कर्मचाऱ्यांना मागील तीन दशकापासून अजूनहीपूर्ण वेतन देत नाही. त्यामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन आता सरकारने द्यावे किंवा सरकारने पूर्ण वेतन न देणाऱ्या संस्थाचालकांच्या विरोधात फौजदारी कारवाई करावी व पीडित शिक्षक कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनाचा लाभ द्यावा. येथील शिक्षक कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी, पीएफ, वैद्यकीय सुविधेचा लाभ प्राप्त करून द्यावा. महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना मॅटरनिटी लिव्ह विथ पे देण्यात यावी. येथील गरीब मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरीता सरकारने, जी राज्यात महाविद्यालयांकरिता चालू केलेली राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिकृती योजना लागू करावी व प्रायव्हेट कॉन्व्हेंट इंग्रजी माध्यम शाळेतील संस्थांची व संस्थाचालकांची आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सरकारने आर्थिक गुन्हे शाखेतर्फे तपासणी करावी या मागण्यांचा प्रामुख्याने समावेश होता. याप्रसंगी उपस्थित शिक्षक कर्मचारी व पालकांनी महात्मा गांधीचे वैष्णव जनतो व ईश्वर अल्ला तेरो नाम, सबको संमती दे भगवान भजन म्हटले.
याप्रसंगी माजी आमदार वामनरावजी चटप, पप्पू देशमुख, बंडू नगराळे, धुनाजी, विवेक आंबेकर, संजय उपाध्ये, संजय कोतपल्लीवार, नंदकुमार आसुटकर, मोहन ठाकूर, संपतराव ईलांणदुला, देविदास चवले , प्रशांत सर सह अनेक शिक्षक, पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.