चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

*कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच जनतेचा विकास करायचा आहे- पालकमंत्री मुनगंटीवार*

मूल – अर्थमंत्री असताना राज्याच्या विकासकामांसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अथक मेहनत घेतली आहे. आताही  शिल्लक असलेला विकास हा कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच करण्याचा मानस असल्याचे मत राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले, ते मूल येथील सुधिरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराच्या वतिने आयोजीत सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते.
शुक्रवारी दुपारी 3 वाजता मूल येथील सुभाष प्राथमिक शाळेच्या पटांगणावर आयोजीत केलेल्या कार्यक्रमाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, महामंत्री नामदेव डाहुले, भाजपा महिला प्रदेशच्या महामंत्री अल्का आत्राम, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष आणि सुधिरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचे संयोजक अविनाश जगताप, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल चुधरी, गजानन वल्केवार, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, भाजपाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर, भाजपा ओबीसी सेलचे नेते प्रशांत बोबाटे, माजी नगर सेवक अजय गोगुलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
      माझा सत्काराचा कार्यक्रम फेल व्हावा यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविला होता, परंतु चांगले काम करनाऱ्याच्या मागे भगवान सुध्दा राहतो, यामुळे मूलचा हा नागरी सत्कार चांगल्या वातावरणात, उत्तम घडवुन आणला आहे, याबद्दल आयोजकांचे नामदार मुनगंटीवार यांनी आभार मानुन  कार्यकर्त्यांच्या सहकार्यानेच नागरीकांचे विकास कामे पुर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी विविध संस्था, संघटनेच्या वतिने नामदार सुधिर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांनी केले संचालन मुनिराज कुटे यांनी तर उपस्थितांचे आभार अमोल चुधरी यांनी मानले. नगरात
जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार यांचा नागरी सत्कार समारंभ असताना समारंभ कार्यक्रम मित्र परिवाराने आयोजित केला परंतु नाम.सुधीर भाऊंच्या विश्वासात असलेल्या  निष्ठावान आजी माजी पदाधिकाऱ्यांची व माजी नगरसेवक यांची नावे  आयोजकांनी पत्रिकेमधे टाकले नसल्याने सत्कार समारंभाला ते अनुपस्थित असल्याचे जाणवले. त्यामुळे राजकीय  वर्तुळात गटबाजी   झाल्याची  चर्चा केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.