
जनता शासकीय – निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक आमसभा संपन्न
गुणवंत विद्यार्थी व निवृत्त सभासदांचा सत्कार
चंद्रपूर : जीवनात आर्थिक व भौतिक प्रगतीचे माध्यम म्हणून कर्मचारी वर्ग पतसंस्था किंवा बँकांना साधन स्वरूपात वापरतो. कर्मचारी पतसंस्था या नोकरदारांच्या आर्थिक गरजा भागविणाऱ्या जीवनवाहिन्या ठरल्या आहेत. अशात जनता शासकीय- निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था ही नागपूर व अमरावती महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना वरदान ठरली आहे. या पतसंस्थेच्या माध्यमातून हजारो कर्मचारी लाभान्वित होत आहे, ही बाब आनंद देणारी असल्याचे उद्गार ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी काढले.
जनता शासकीय- निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर या पतसंस्थेची वार्षिक आमसभा काल (दि.२४) ला स्थानिक जनता शिक्षण महाविद्यालयाच्या श्री.लिला सभागृहात पार पडली. त्यावेळी डॉ. अशोक जीवतोडे बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र देवाळकर होते. प्रमुख पाहुणे स्वरूपात ओबीसी नेते डॉ. अशोकराव जीवतोडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते रविंद्र शिंदे, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांतजी गोहोकर पाटील, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अंबर जीवतोडे, पतसंस्थेचे संचालक डॉ. आशीष महातळे, सचिव राजू वडस्कर तथा पतसंस्थेचे संचालक मंडळ यांची मंचावर उपस्थिती होती. प्रथमताः मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वर्गीय श्रीहरी जीवतोडे गुरुजी आणि लिलाबाई जीवतोडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून तथा द्विपप्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र देवाळकर यांनी पतसंस्थेच्या आर्थिक वाटचालीवर प्रकाश टाकला. प्रमुख पाहुणे रविंद्र शिंदे यांनी वर्तमानकालीन वाटचाल बघता जनता शासकीय-निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था ही भविष्यात जनता बँक म्हणून नावारूपास यावी, अशा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चंद्रकांतजी गोहोकर पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दिलीप चिंधुजी सोरते, रघुनाथ नारायण काळे, अशोक सदाशिव क्षीरसागर, दमयंती किशोर वाकडे, लंबोदर शंकर वडस्कर, चंद्रशेखर गन्फा बोबडे, राजेंद्र बाबुराव राजूरकर, मनोहर मारोती ठक, विना गुलाबराव उमरे, दीपक वामनराव मेंढे, सुलोचना गोविंदराव अवगान, वैशाली पी. भटारकर, भारत नानाजी पोले, गजानन चंद्रभान जेनेकर, दिलीप नामदेवराव बरडे, केशव नीलकंठ ठोंबरे, प्रकाश विठ्ठलराव कुंभारे, अरुण नीलकंठ काळे, देवराव रामदास किंगरे, वामन नीलकंठ देवाळकर, गणेश संभाशिव खंडाळकर, किशोर वाल्मिकराव पडाडे, अतुल नारायण राहाटे, किशोर पुंडलिकराव गहूकर, माया अरुण हुसुकले, अनंत नारायण ठाकरे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. गुणवंत गौरव पुरस्कारामधे विनय अजय भगत, गौरवी राजेश पत्तीवार, अर्थ भास्कर लेनगुरे, गौरी राजू गोबाले, वैष्णवी रमेश कटरे, आर्या चिन्मत्रा चालुरकर, सुमेध सुनील झाडे, मनीष लोमेश देशमुख, सृष्टि गुलाब भोयर, अंकित विलास पारखी, निलय लीलाधर खंगार, चैतन्य नंदकिशोर सुर, तृणय नरेंद्र कोंगलवार, साक्षी सुनील टोंगे, आरती अरुण काळे, विवेक दिलीप परागे, श्रेयश राजू वानखेडे, गणेश रत्नाकर शिकरे, रक्षा सुरेश सोरते, सारंग राजेंद्रकुमार राजुरकर, समीर ज्ञानेश्वर बोबडे यांचा सत्कार करण्यात आला. विशेष पुरस्कारामधे रविकांत निळकंठ वरारकर, गजानन कासावार, विनोद मारोतराव बळी आदींचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, तथा रोख रक्कम प्रदान करून
सत्कार करण्यात आला.
वार्षिक आमसभेचे प्रास्ताविक पतसंस्थेचे अध्यक्ष रवींद्र देवाळकर यांनी, संचालन विनिता सोयाम तसेच आभार प्रदर्शन उपाध्यक्ष डॉ. आशिष महातळे यांनी केले.
सभेत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी पालक तथा विद्यार्थीगण उपस्थित होते. सभा यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतले.