
मूल (ता.प्र.)कोरोना विषाणुच्या आपत्तीने संपूर्ण जनजिवन विस्कळीत झाले असून सर्व आर्थिक व्यवहार सुध्दा प्रभावीत झाल्याने या पाश्वभुमिवर शेती सबंधीत कर्ज विशेषता बिनव्याजी कर्जाच्या परतफेडीची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने तातडीने घेतल्याने कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांला फार मोठा दिलासा मिळाला असल्याने महाराष्ट्र राज्याचे नाम.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री नाम.अजीत पवार, मदत व पुर्नवसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार, जिल्ह्याचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे जाहीर आभार जि.प.चे माजी अध्यक्ष तथा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संतोष रावत यांनी मानले आहे.
शासनाचे शेतमाल खरेदी केंद्र बंद पडले असून अशा बिकट परिस्थीतीत आर्थीक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना शेती विषयक कर्जाची परतफेड कशी करावी असा प्रश्न पडल्याने कर्जाची परतफेड करण्यांची मुदत वाढविण्यांत यावी अशी मागणी मुल तालूक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी व सभासद शेतकरी तसेच तालूका काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, क्रेडीट सहकारी सोसायटीचे पदाधिकारी व संचालक यांनी लेखी निवेदनाव्दारे केल्याने वेळीच दखल घेऊन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी जि.प.अध्यक्ष संतोष रावत, यांनी पालकमंत्री तथा मदत व पुनर्वसन मंत्री नाम.विजय वडेट्टीवार, खासदार बाळूभाऊ धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर, सुभाष धोटे यांना निवेदन पाठवून केलेल्या मागणीचा पाठपुरावा लाऊन धरला असता मागणीची राज्य व केन्द्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने यथाशिघ्र दखल घेऊन शेती सबंधी कर्जाची परतफेडीची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्याचे आदेश निर्गमीत केल्याने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाल्याने शासनाप्रती जाहीर आभार मानले आहेत.
यामध्ये महत्वाची भुमिका माजी जि.प.अध्यक्ष तथा मध्यवर्ती बैकेचे संचालक संतोष रावत यांची असल्याने तालूका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती घनशाम येनुरकर,पं.स.माजी सभापत्ती तथा सदस्य व संचालक संजय मारकवार,न.प.चे माजी उपाध्यक्ष तथा संचालक राकेश रत्नावार, उपसभापत्ती संदिप कारमवार, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजेंन्द्र कन्नमवार, संचालक अखिल गांगरेड्डीवार, के्रडीट सह.सोसायटीचे अध्यक्ष धनंजय चिंतावार नगरसेवक विनोद कामडी यांनी सुध्दा मागणी मंजूर करवून घेतल्याबददल पल नामदारांप्रति कृतज्ञता व्यक्त केले आहे.



