
चंद्रपूर(का. प्र.) आज सकाळी शनिवार रोजी सव्वादहाच्या सुमारास एम. आय. डी. सी. मधील कापसाच्या जिनिंगला आग लागली असून मोठ्या प्रमाणात कापूस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला आहे. फायर ब्रिगेडच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचा प्रयंत्न करण्यात आला.वृत्त लिहेपर्यंत आगीचे कारण कळू शकले नाही.



