चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

….एकनाथ शिंदेची सेनेला भाजपबरोबर जाण्याची अट

महाराष्ट्रात पुन्हा फडणवीस सरकार?

विधान परिषदेच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण अधिक तापलं आहे. भाजपने  राज्यसभेच्या निवडणुकीत उमेदवार निवडून आणले. त्याचीच पुनरावृत्ती विधानपरिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळाली. भाजपने काल त्यांचे पाच उमेदवार निव़डून आणले. तेव्हापासून महाविकास आघाडी बिघाडी असल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदे सह  सध्या 13 आमदारांसह गुजरातमधील सुरतच्या ग्रॅन्ड भगवती हॉटेलमध्ये आहेत. सध्या शिवसेनेचे 29 आमदार फुटल्याची माहिती मिळाली आहे. एकनाथ शिंदे बारा वाजता पत्रकार परिषद घेणार होते.

गुजरातमध्ये असलेले आमदार सुरतहून अहमदाबादला हलवण्याची शक्यता आहे. फुटलेल्या आमदारांना अमित शहा भेट होण्यास असल्याची माहिती मिळाली आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलं आहे. जवळपास 29 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे हे गुजरातच्या सुरतमध्ये दाखल झाले आहेत. वेगळा गट किंवा भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचाली शिंदे यांनी सुरू केल्या आहेत. आज संध्याकाळपर्यंत ते भाजपचे नेते अमित शहा यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे शिंदे यांच्या प्रत्यके हालचालींकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर तात्काळ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली आहे. दिल्लीतील बड्या नेत्यांसोबत फडणवीस चर्चा करणार आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा फडणवीस सरकार येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. शिंदे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याच्याही चर्चा होत आहे. फडणवीस दिल्लीत गेल्याने या चर्चांना अधिक जोर चढला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.