चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

इनरव्हील क्लब ची कॅन्सरवर जनजागृतीसाठी ‘पिंक वॉकथॉन रॅली

चंद्रपूर:-ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढत्या प्रमाणामुळे महिलाचे आरोग्य धोक्यात येत आहे. लोकांमध्ये कॅन्सर बद्दल जनजागृती व्हावी या अनुषंगाने इनरव्हील क्लब च्या चार संघटना एकत्र येऊन ‘पिंक वॉकथॉन ‘रॅली काढण्यात आली.जनजागृती रॅली ची सुरुवात जिल्हा कोषाध्यक्ष रमा गर्ग व पिडीसी किर्ती चांदे यांनी झेंडा दाखवत नागपूर रोड वरील शकुंतला लॉन पासून करण्यात आली, जनता कॉलेज मार्गे साईबाबा मंदिराजवळ व्याख्यान सादर करीत कर्करोग निदानाचे पिंक बँड एकमेकांना बांधून परत शकुंतला लॉन येथे रॅली चे समारोप करण्यात आले.
इनरव्हील क्लब द्वारे  जनतेला आव्हान करण्यात आले की महिलांनी ब्रेस्ट कॅन्सर विषयी भीती न बाळगता आपल्या तपासण्या करून घ्याव्या व कॅन्सरचा रुग्ण कुठेही आढळल्यास इनरव्हील क्लबच्या संघटनेशी संपर्क करावा. इनरव्हील क्लब त्यांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर राहील. या रॅलीत इनरव्हील क्लब ऑफ चंदा फोर्ट अध्यक्षा सोनल बुक्कावार,  क्लब ऑफ एंजल च्या अध्यक्षा अपेक्षा धवलराजा, क्लब ऑफ चंद्रपूर च्या अध्यक्षा ममता दादूरवाडे, क्लब ऑफ स्मार्ट सिटी च्या अध्यक्षा पुनम कपूर यांच्यासह सर्व संघटनेच्या सदस्य उपस्थितीत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published.