

ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 5 कोटी 16 लाख रुपयांच्या विकासकामांचे भुमीपुजन व लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला आहे. मेंडकी हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने मोठे असल्याने गावात पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत सुमारे ५ कोटी रुपयांची वाढिव नळपाणी पुरवठा मंजूर करण्यात आली असुन सदर योजनेचे भूमिपूजन व गावातील नागरिकांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे यासाठी खनिज विकास निधीतून १६ लाख रूपये खर्च करून उभारण्यात आलेल्या आरोचे लोकार्पण, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या बांधकामाचे भुमिपुजन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, पंचायत समिती माजी सदस्य थानेश्वर पाटील कायरकर, ब्रम्हपुरी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ मंगलाताई लोनबले, मेंडकी ग्रामपंचायत सरपंचा सौ.मंगलाताई ईरपाते, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ भावनाताई ईरपाते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर, ग्रामपंचायत सदस्या सौ जयश्री आंबोरकर, ग्रामपंचायत सदस्या सौ मोक्षाली शेंडे, ग्रामपंचायत सदस्या पुष्पाताई गभणे, ग्रामपंचायत सदस्या,कुंदाताई कोरेवार, ग्रामविकास अधिकारी अरविंद लांजेवार, मधुकर करंजेकर, हिरामण कसारे,अरुण करंजेकर, घनश्याम जेल्लेवार, सुनील करंजेकर, निर्मला दुमाणे, उषाताई करंजेकर, वसंता मारभते, मधुकर कोरेवार, राकेश कायरकर,नरेश वाघुरकर, मनोज अगळे, निर्मला निकोळे, सुनिता कसारे, रामाजी वैरकार,आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेंडकी येथे नूतन वाढिव नळपाणी पुरवठा योजना विकसित होत असल्याने येथील गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करीत आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले आहेत.


