चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

सार्वजनिक शौचालयात आढळला इसमाचा मृतदेह

राजुरा नगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयात एका इसमाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असुन सदर मृतदेह लक्षपती गुरूनुले नामक व्यक्तीचा असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

प्राप्त माहितीनुसार राजुरा येथील आंबेडकर वॉर्डातील नगर पालिकेच्या सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करण्याकरिता सकाळी 6:00 वाजताच्या सुमारास एक कर्मचारी गेला असता तिथल्या एका शौचालयात एक इसम मृतावस्थेत असल्याचे आढळुन आले.

घटना लक्षात येताच त्याने आपल्या वरिष्ठांना माहिती दिली. त्यांनतर राजुरा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शौचालयाचे दार तोडून आतील मृतदेह बाहेर काढला असता तो मृतदेह लगतच्या किसान वॉर्ड येथिल 48 वर्षीय लक्षपती गुरुनुले ह्याचा असल्याचे लक्षात आले. हा इसम आपल्या घरी एकटाच राहत असल्याचे कळले आहे. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असुन उत्तरीय तपासणीसाठी सदर मृतदेह राजुरा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.