चंद्रपुर

संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा निर्णय १२ तासांत मागे

चंद्रपूर (का.प्र.)चंद्रपूर संचारबंदी अंशतः शिथिल करण्याचा घेतलेला निर्णय जिल्हा प्रशासनानं १२ तासांत मागे घेतला. आजपासून संचारबंदी अंशतः शिथिल करून इलेक्टड्ढॉनिक्स आणि इलेक्टिड्ढकल उपकरणांची दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली होती. यासोबतच इतरही गरजेच्या वस्तूंची दुकाने उघडण्यासाठी ठराविक वेळ आणि दिवस निश्चित करून देण्यात आला होता. यासंबंधीचा निर्णय काल सायंकाळी घेतल्यानंतर आज बाजारपेठ लोकांनी फुलून गेली. संचारबंदीचे सर्रास उल्लंघन करीत शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी घेऊन नागरिक गर्दी करताना दिसले. हे चित्र अंगलट येण्याची शक्यता दिसताच जिल्हाधिकाèयानी निर्णय मागे घेत पुन्हा संचारबंदी जैसे थे कायम ठेवली.

कोरोनाबाधित एकही रुग्ण जिल्ह्यात नसल्यामुळे काही लोकांनी प्रशासनाकडे अत्यावश्यक वस्तूंची दुकान सुरु करण्याची मागणी केली होती. त्यामुळे दररोजच्यावापरातील काही वस्तूंची दुकाने आजपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयानंतर बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी बघायला मिळाली. त्यामुळे अखेर जिल्हा प्रशासनाला अवघ्या१२ तासातच संचारबंदी अंशत: शिथील करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं आहे. त्यामुळे देशभरात जीवनाश्यक वस्तू वगळता सर्व दुकानं बंद आहेत.

महाराष्ट्रातही या संचारबंदीचे काटेकोर नियम पाळले जात आहेत. मात्र, चंद्रपुरात संचारबंदी अंशत: शिथील करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता.या निर्णयानुसार जिल्ह्यातील इलेक्टिड्ढकल, इलेक्टड्ढॉनिक्स, मोबाईल विक्री आणि दुरुस्ती, स्टेशनरी, जनरल स्टोअर्स, हार्डवेअर, कापड दुकान आणि लाँन्डड्ढीच्या दुकान मालकांना आपली दुकानं उघडण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, आता प्रशासनाने हा निर्णय मागे घेतल्यामुळे ही दुकानं बंदच राहणार आहेत.

विशेष म्हणजे या सर्व दुकानांना सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. प्रत्येक सेवेसाठी वेगवेगळे दिवस ठरवून देण्यात आले होते. हे सगळं प्रायोगिक तत्वावर होतं. यामुळे अनावश्यक गर्दी होत असेल आणि लोक नियम पाळत नसतील तर या निर्णयावर फेरविचार होऊ शकतो, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकाèयांनी दिली होती.संचारबंदी शिथील करताच आज सकाळी बाजारपेठांमध्ये लोकांची तुफान गर्दी बघायला मिळाली. संचारबंदीचं सर्रास उल्लंघन करीत शहरातील रस्त्यांवर दुचाकी, चारचाकी घेऊन नागरिक गर्दी करताना दिसले. हे चित्र अंगलट येण्याची शक्यता दिसताच जिल्हाधिकाèयांनी निर्णय मागे घेत पुन्हा संचारबंदी जैसे थे कायम ठेवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *