बल्लारपूर(प्रति) : मागील एक महिन्या पासून बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी वनातून वाळू तस्करी करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणे सुरु केल्यामुळे वाळू चोरटे पळवाटा शोधू लागले आहे.अश्यात लावारी येथे शनिवारी आणखी एक टॅक्टर जप्त करण्यात आले आहे बल्लारशाह वन परिक्षेत्रा अंतर्गत उपक्षेत्र कळमना मधील लावारी -१ बीटातील कक्ष क्रमांक ५७३ मध्ये २० जून ला अवैधरित्या खोदकाम करून वाळूची वाहतूक करून वाळू लावारी गावालगत जमा करून ठेवल्याचे निर्देशनास आले असता या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करून टॅक्टर जप्त करण्यात आले आहे
सदर कारवाई कळमना बिट चे क्षेत्र सहायक आकाश मल्लेलवार,वनरक्षक मनोज धाईत,राकेश शिवणकर, संजय सूरवसे यांनी केली या प्रकरणात टॅक्टर मालक विनोद सुंदर बत्तलवार,चालक मंगेश सुरेश पाचभाई,मजूर परमेश्वर कर्णू सोयाम,व सुरज आनंद मडचापे यांचेवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २,२६(१) ग अन्वये वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे.व महिंद्रा चे टॅक्टर क्रमांक बी २७५ डीआय ७३५ व ट्राली क्र.एमएच ३४ एल २३५८ जप्त करण्या आले आहे पुढील तपास उपवनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चे गजेंद्र हिरे यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारशाह चे संतोष थिपे करीत आहे. महसूल विभागाकडून अनधिकृत गौण खनिजाची जप्त केलेली वाहने सोडताना गौण उपजाचे बाजार मूल्य अधिक ५ पट दंडाची रक्कम आकारल्या जाते त्यानुषंगाने व वनकायद्यान्वे पुढील कारवाई करण्यात येणार आहे.



