
नागभिड तहसील अंतर्गत येणाऱ्या नवेगाव हंडेस्वरी येथील आडकुजी मारोती गेडाम वय ६० वर्ष हा सकाळी ७ वाजता तेंडू पत्ता तोड न्याकरिता शिवारातील जंगलात गेला असता दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघ दबा धरून बसला तेव्हा हमला करून ठार केले.असे शेजारी तेण्डू पाने तोडणाऱ्याच्या लक्षात येताच गावात माहिती देण्यात आली. लगेच वन विभाग नागभिड माहिती देण्यात आली. वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. महेश गायकवाड व त्यांची चमू घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय नागभिड येथे पाठविण्यात आले. शवाचे शवावीच्यादन करून शव कुटुंबीयांना देण्यात आले असून वन विभागाच्या वतीने अंत्यसंस्कार करिता सानुग्रह अनुदान देण्यात आले. यानंतर शासकीय धोरणानुसार आर्थिक मदत देण्यात येईल असे वनपरिक्षेत्र अधिकारी डॉ महेश गायकवाड यांनी सांगितले.


