
चंद्रपूर (का.प्र.)कोविड-१९ या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरीत सर्व प्रतिष्ठाने व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. केंद्र शासनाने संचारबंदी काळात जवळपास ८० कोटी लोकांना स्वस्त दराने धान्य पुरवठा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पिवळे व केशरी राशन कार्ड धारक तसेच परप्रांतीय मजूर वर्गासाठी तात्पुरत्या स्वरूपात राशन कार्ड तयार करून धान्य वितरण करण्यात येत आहे. परंतु ज्या गीरब व गरजू कुटुंबांकडे राशन कार्ड नाहीत त्यांना ही धान्य वितरण होणे आवश्यक आहे.
बिना रेशन कार्डचे अनेक कुटुंब आहेत हे उघड सत्य आहे. अनेक कुटुंब या काळात उपाशी पोटी राहतात अशी गंभीर माहिती येत असल्याने यांच्या बाबतीत प्रशासनाने राज्य सरकार कडून मान्यता घेऊन qकवा अशा कुटुंबांना सिएसआर, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेचा निधी वापर करून मनपा, न.प., जि.प., पं.स. यांच्या माध्यमातून धान्य वाटप करण्याच्या सूचना पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे केलेल्या आहेत.



