चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यात सातत्याने जाणारे बळी ही अतिशय चिंतेची बाब असून या नरभक्षक वाघांना त्वरीत जेरबंद करावे, अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. 14 डिसेंबर रोजी मुल तालुक्यातील कांतापेठ येथे देवराव सोपनकार, सावली तालुक्यात बाबुराव कांबळे व 15 डिसेंबर रोजी खेडी येथे स्वरूपा येलट्टीवार यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यु झाला. त्याआधी 7 डिसेंबर रोजी पेटगांव येथे देखील वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यु झाला. सतत होणारे वाघांचे हल्ले व नागरिकांचे जाणारे बळी ही चिंतेची बाब आहे. या वाघांना तातडीने जेरबंद करण्याची आवश्यकता आहे. याबाबत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी वनविभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी व सर्व संबंधित अधिका-यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश दिले आहे.
योग ही निसर्गाने पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन धावपळीच्या जिवनात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करु लागला आहे. मात्र कोरोना संकटाने आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नसल्याची शिकवण दिली आहे. योगामुळे आपले शरीर, मनाला अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभते. योग ही निसर्गाने मनुष्याला पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी असुन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता किमान एक तास योगा करण्याची गरज त्यामुळे आपण योग प्रकाराला प्रोत्साहन मिळावे योग करण्यासाठी स्वंतत्र व्यासपीठ असावे या करिता योग भवन निर्मितीसाठी साठी एक करोड रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. आज मंगळवारी जागतिक योग दिनानिमित्त योग नृत्य परिवार ट्रस्ट यांच्या वतीने तर यंग चांदा ब्रिगेड यांच्या संयोजनाने पोलिस मैदान येथे विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाला रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, डॉ. गोपाल मुंदडा, आकाश घोडमारे, आशिष झा, ऐकाडे, सुरेश घोडके, प्रशांत कत्तुलवार, शशिकांत मस्के, जितेंद्र ईजगोरवार, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, प्रा. श्याम हेडाऊ, विश्वजित शाहा, अमोल शेंडे, राम जंगम, विलास वनकर, विलास सोमलवार युवती प्रमुख भाग्यश्री हांडे आदिंची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हा प्रदूषित जिल्हा आहे. अशा प्रदूषित आणि उष्ण जिल्ह्यात निरोगी राहण्यासाठी योग आणि योग नृत्य नित्य करणे गरजेचे आहे. शरिराराला ऊर्जा देण्यासाठी व्यस्त जिवणात थोळा वेळ काढून योग करत शरिर स्वस्थ ठेवले पाहिजे. आयोजकांनी योगाचा योग नृत्य हा नविन प्रकार चंद्रपूरात सुरु केल्या बदल यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजकांचेही आभार मानले. योगा हा व्यक्तीला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक पातळीसारख्या सर्व आयामांवर नियंत्रण ठेवून उच्च पातळीची संवेदनशीलता प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तसेच अभ्यासावर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाच्या रोजच्या सरावाला शाळा आणि महाविद्यालयानेही प्रोत्साहन दिले पाहिजे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली जीवनशैली संपूर्ण बदल केला आहे मात्र कोरोनामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपल्याला कळले आहे. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्विकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्विकारली नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपूरातही योगाचे महत्व नागरिकांना पटावे त्यांना योग साधना करण्याकरिता स्वताचे भवन असावे या भवनातून योगाचा प्रसार प्रचार व्हावा या करिता चंद्रपूरात योग भवनाची निमिती व्हावी या करिता माझे प्रयत्न असणार असुन या भवनासाठी एक करोड रुपये देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या योग नृत्य महोत्सवात योग साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
* गत 24 तासात 22 कोरोनामुक्त * आतापर्यंत 22,589 जणांची कोरोनावर मात * ॲक्टीव पॉझिटिव्ह 114 चंद्रपूर, दि. 3 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 22 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 10 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 23 हजार 95 झाली असून त्यापैकी […]