चंद्रपुर :- अखेर पाचव्या दिवशी वर्धा नदीच्या धानोरा पुलावरून पाणी उतरले असून वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान धानोरा गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. 12 सप्टेंबर पासून वर्धा नदीच्या पात्रातुन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नदीला पूर आला त्यामुळे धानोरा पुलावरून पाणी वाहत होते.त्यामुळं धानोरा गावाचा संपर्क पाच दिवसांपासून तुटला होता.तर धानोरा गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळं या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान शुक्रवारी सकाळी धानोरा नदीच्या पुलावरून पाणी ओसारल्यानं येथील वाहतूक सुरू झाली आहे.
दरम्यान धानोरा गावातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.तर पुरामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.