राजुरा (ता.प्र) :– आज दुपारी पुन्हा एकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राजुरा शहरातील साईनगर येथे मिळाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. ही व्यक्ती राजुरा येथे संस्थात्मक विलगीकरणात होती अशी माहिती आहे.प्राप्त माहितीनुसार ही व्यक्ती राजुरा येथिल रहिवासी असुन तो मुंबई येथे वास्तव्यास होता. परत आल्यापासून तो आदिवासी वसतीगृहात संस्थात्मक विलगीकरणात होता. नियमित तपासणी दरम्यान त्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर येथिल आयसोलेशन सेंटर मधे पाठविण्यात आले आहे. आता मात्र राजुरा शहरातील जनतेनी सतर्क राहून विनाकारण घरा बाहेर पडू नये अशी विनंती स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.




