शुक्रवारी आणखी 39 कोरोना बाधित
उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 409
609 बाधित कोरोनातून बरे
चंद्रपूर, दि. 14 ऑगस्ट: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असली तरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या 1027 झाली आहे. तथापी, जिल्ह्यातील दुर्गापुर, घुग्घुस, बल्लारपूर, नागभीड कोरोनाचे हॉटस्पॉट झालेले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क राहून लक्षणे दिसून आल्यास तात्काळ अँटीजेन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 39 बाधिताची नोंद झाली आहे.काल सायंकाळी 988 असणारी बाधितांची संख्या आज 1 हजार 27 वर पोहोचली आहे. यापैकी 609 रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले असून 409 बाधितावर उपचार सुरू आहेत.आज पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील 17, चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथील 5, गडचांदूर येथील 2, बल्लारपूर शहरातील 6, पोंभूर्णा, गोंडपिपरी, सावली आणि ब्रह्मपुरी येथील प्रत्येकी एक, राजुरा दोन तर वरोरा येथील तीन असे एकुण 39 बाधितांचा समावेश आहे.चंद्रपूर शहरातील पोलिस कॉर्टर तुकुम परिसरातील तीन, सीटीपीएस रोड परिसरातील एक, कोंडी वार्ड नंबर 5 येथील दोन, दडमल वार्ड सोमेश्वर मंदिर परिसरातील तीन, जटपुरा गेट परिसरातील एक, बालाजी वॉर्ड नंबर 2 येथील दोन, वेटर्नरी वार्ड येथील दोन, इंदिरानगर येथील एक, चोर खिडकी येथील एक, जगन्नाथ बाबा नगर परिसरातील एक, पठाणपुरा परिसरातील एक बाधित पुढे आलेले आहेत.चंद्रपूर तालुक्यातील घुगुस येथील 5 बाधित पुढे आले आहेत.गडचांदूर येथील दोन पॉझिटिव्ह ठरले आहे.विवेकानंद वार्ड बल्लारपूर येथील दोन, गोकुळ नगर येथील तीन तर बल्लारपूर शहरातील एक पॉझिटिव्ह पुढे आले आहे.पोंभुर्णा येथील एक, गोंडपिपरी येथील एक, ब्रम्हपुरी तालुक्यातील मांगली येथील एक, सावली तालुक्यातील हिरापूर येथील एक, राजुरा येथील कर्नल चौक परिसरातील एक, आंबेडकर वार्ड राजुरा येथील एक बाधित पुढे आलेले आहेत. वरोरा तालुक्यातील बोर्डा येथील एक तर वरोरा शहरातील दोन बाधित ठरले आहे.




