चंद्रपूर : शासन आपल्या दारी अंतर्गत भद्रावती तालुक्यातील मौजा मानोरा येथे शेतक-यांना कृषी विभागाच्या योजना तसेच आगामी खरीप हंगामाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासणी, सोयाबीन व धान पिकाकरिता बीजप्रक्रिया, निंबोळ्या गोळा करणे मोहीम, भाऊसाहेब फंडकर फळबाग लागवड योजना, आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य कार्यक्रम आदींचा समावेश होता. यावेळी सरपंच निरंजना हनवते यांच्यासह गावातील इतर शेतकरी बांधव उपस्थित […]
चंद्रपूर जिल्ह्यातील कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे केलेल्या (officers of Water Conservation Office, Chandrapur ) कामाच्या बिलाची वितरीत केलेल्या बिलाकरिता व उर्वरित रक्कम वितरीत करण्याकरिता 50 लाखाची लाच घेतल्याप्रकरणी जलसंधारण कार्यालय चंद्रपूर येथील 2 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर येथे मंगळवारी उशिरा करण्यात आली. दरम्यान या कारवाईत नागपूर च्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली […]
चौकीदार शंकर सुभाष वैरागडे याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार चंद्रपूर, ता. ८ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी “आसरा” कोविड हॉस्पीटल चंद्रपूर माहे मे २०२१ मध्ये सुरु करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने सदर हॉस्पीटल येथे १६ नग कॅमेरे लावण्यात आले. ०८/०७/२०२१ रोजी रात्री ११.३० ते रात्री १२.०० च्या दरम्यान कॅमेऱ्याची इलेक्ट्रीक सप्लाय केबल […]