चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

कापड दुकानाला भिषण आग….

इमारतीमधील दोन्ही मजले आगीत.स्वाहा

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय – लाखोंचे कापड आगीत भस्मसात

चंद्रपूर येथील वर्दळीच्या व शहरात जाणाऱ्या मुख्य मार्गाच्या लगत असलेले युब कलेक्शन नामक तयार कापडाच्या (Readymade) दुकानाला मध्यरात्री लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. चांदा ब्लास्ट प्रतिनिधीने घटनास्थळी जाऊन बघितले असता युब कलेक्शन चे दोन्ही मजले संपुर्ण जळल्याचे आढळुन आले.

प्राप्त माहितीनुसार सदर दुकान रात्री 10:30 वाजता बंद करून कर्मचारी आपापल्या घरी गेले.  दरम्यान नेमक्या कालच्याच दिवशी दुकान मालक बाहेरगावी गेले होते हे विशेष. दुकान बंद केल्याच्या अवघ्या तासाभरातच बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग लागली. दुकानाचे सर्व दरवाजे बंद असल्याने लागलेली आग आतल्या आत धुमसत होती. दुकानात कापड व वेष्टणांसाठी प्लास्टिक वापरण्यात येत असल्याने काही वेळातच ही आग वरच्या मजल्यावर पोहचली व तिथेही आगीने थैमान घातले.

आग लागल्याचे कळताच दुकानदार तत्काळ घटनास्थळी आले. दुकानात आगीने रौद्ररूप धारण केले होतेच अशातच काही लोकांनी पुढील अनर्थ टाळण्यासाठी दुकानाच्या काचा फोडल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले अन्यथा दुकानात गॅस भरल्यामुळे स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. दुकानमालकाने प्रयत्नाने दुकानातील सुखरूप वाचलेले काही कपडे व डमी बाहेर काढून ठेवले मात्र चोरट्यांनी त्यावरही डल्ला मारून ते साहित्य परस्पर लांबविले.

Leave a Reply

Your email address will not be published.