
चंद्रपूर (का.प्र.) कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होत आहे. मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण सुरू असून उद्रेकाच्या काळात सामना करण्याची तयारी केली जात आहे. मात्र या उद्रेकाच्या मुळाशी असणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापासून पोलिसांची कारवाई सक्त होणार असून जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडण्याबाबतहीजिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते. विनाकारण घराबाहेर पडून कोरोना आजाराला आमंत्रण देणाèया नागरिकांवर आता सक्ती केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, यांनी शासनाने दिलेले सर्व नियम व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे.
याबाबत मनमानीकरणाèयांवर देखील कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाèयांनी दिले आहे. चंद्रपूर महानगर तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आणि सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये काम करणारे भाजीविक्रेते, किराणा दुकानदार व जीवनावश्यक सेवेत असणाèया सर्व दुकानदारांनी, व्यापाèयांनी या परिस्थितीमध्ये कुठल्याही बाबीवर अडून न राहता शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करण्याचे स्पष्ट संकेत आज देण्यात आले आहे.


