चंद्रपूर(का.प्र.): शहरालगत असलेल्या लोहारा गावातील जंगल परिसरात काल दुपारी 4 वाजता एका झाडाला इसमाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. गुरुदास शेडमाके असे मृत इसमाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार गावातील काही नागरिक लोहारा गावातील जंगल परिसरात दुपारच्या सुमारास गेले असता त्यांना एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याची माहिती गावातील नागरिकांना पोलिसांना देण्यात आली.त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत..
Related Articles
अहीर गवळी समाजाच्या १० व ११ व्या सामूहिक विवाह सोहळा
◾पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न. जालना : जालना येथे आयोजित अहीर गवळी समाजाच्या १० व ११ व्या सामूहिक विवाह सोहळा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री. हंसराज अहीर व गवळी समाजाच्या महाराष्ट्र, जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी त्यांनी नवपरिणीत दाम्पत्यास आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. सामूहिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम […]
छ. शिवाजी महाराजांची वाघनखे आणि जगदंब तलवार परत करण्याबाबत ब्रिटीश अधिकाऱ्यांची ना.मुनगंटीवारांशी चर्चा
महाराष्ट्राचा स्वाभिमान, मराठी माणसाचा अभिमान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली जगदंब तलवार व वाघनखे भारतात आणण्याच्या दृष्टीने ब्रिटिश उपउच्चायुक्त ॲलन गॅम्मेल यांनी ब्रिटीश सरकारच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला. यासंदर्भात मुंबईत त्यांच्याशी झालेली चर्चा अत्यंत समाधानकारक झाली असून त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनातील दृढ निश्चय पूर्ण होणार आहे अशी माहीती राज्याचे सांस्कृतिक कार्य […]
*गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध — माजी आमदार अँड संजय धोटे*
खामोना येथे 10 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न राजुरा :– ग्रामीण भागातील सर्व मूलभूत सोय सुविधा उपलब्ध व्हावी याकरिता ग्रामपंचायत नेहमी सहकार्य करत असते त्यामधून गावातील सर्वांगीण विकास घटत असते,खामोना गावाच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आपल्या पाठीशी पुर्ण ताकतीशी उभे असून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे माजी आमदार अँड संजय धोटे […]



