चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

योग भवणाच्या निर्मितीसाठी एक करोड रुपये देणार – आ. किशोर जोरगेवार

योग ही निसर्गाने पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी

आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन   

धावपळीच्या  जिवनात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करु लागला आहेमात्र कोरोना संकटाने आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नसल्याची शिकवण दिली आहेयोगामुळे आपले शरीरमनाला अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभतेयोग ही निसर्गाने मनुष्याला पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी असुन  शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज  चुकता किमान एक तास योगा करण्याची गरज त्यामुळे आपण योग प्रकाराला प्रोत्साहन मिळावे योग करण्यासाठी स्वंतत्र व्यासपीठ असावे या करिता योग भवन निर्मितीसाठी साठी एक करोड रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.
आज मंगळवारी जागतिक योग दिनानिमित्त योग नृत्य परिवार ट्रस्ट यांच्या वतीने तर यंग चांदा ब्रिगेड यांच्या संयोजनाने पोलिस मैदान येथे विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होतेया प्रसंगी ते बोलत होतेया महोत्सवाला रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळेडॉगोपाल मुंदडाआकाश घोडमारेआशिष झाऐकाडेसुरेश घोडकेप्रशांत कत्तुलवारशशिकांत मस्केजितेंद्र ईजगोरवारयांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्तामहिला शहर संघटिका वंदना हातगावकरप्राश्याम हेडाविश्वजित शाहाअमोल शेंडेराम जंगमविलास वनकरविलास सोमलवार युवती प्रमुख भाग्यश्री हांडे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले किचंद्रपूर हा प्रदूषित जिल्हा आहेअशा प्रदूषित आणि उष्ण जिल्ह्यात निरोगी राहण्यासाठी योग आणि योग नृत्य नित्य करणे गरजेचे आहेशरिराराला ऊर्जा देण्यासाठी व्यस्त जिवणात थोळा वेळ काढून योग करत शरिर स्वस्थ ठेवले पाहिजेआयोजकांनी योगाचा योग नृत्य हा नविन प्रकार चंद्रपूरात सुरु केल्या बदल यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजकांचेही आभार मानले.
योगा हा व्यक्तीला शारीरिकमानसिकसामाजिक आणि बौद्धिक पातळीसारख्या सर्व आयामांवर नियंत्रण ठेवून उच्च पातळीची संवेदनशीलता प्रदान करतेविद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तसेच अभ्यासावर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाच्या रोजच्या सरावाला शाळा आणि महाविद्यालयानेही प्रोत्साहन दिले पाहिजेरोजच्या  धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली जीवनशैली संपूर्ण बदल केला आहे मात्र कोरोनामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलोनिरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपल्याला कळले आहेभारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्विकारली असूनयोगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेतजगभरातील देशांनी केवळ योग स्विकारली नाहीतर त्याचा प्रचार आणि प्रसारही केलाआताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहेचंद्रपूरातही योगाचे महत्व नागरिकांना पटावे त्यांना योग साधना करण्याकरिता स्वताचे भवन असावे या भवनातून योगाचा प्रसार प्रचार व्हावा या करिता चंद्रपूरात योग भवनाची निमिती व्हावी या करिता माझे प्रयत्न असणार असुन या भवनासाठी एक करोड रुपये देणार असल्याचेही ते यावेळी म्हणालेया योग नृत्य महोत्सवात योग साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Leave a Reply

Your email address will not be published.