चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मॅरेथॉन स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे यश

चंद्रपूर:मध्य प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाच्यावतीनेपचमढीयेथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धे मध्ये रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे सदस्य उत्तम डाखरेयांनी२१किलोमीटरचीमॅरेथॉन स्पर्धा विक्रमी वेळात पार केली.तसेच रोटरी क्लब चंद्रपूरच्या इतर सदस्यांनी ५ किलोमीटर मॅरेथॉनस्पर्धेत सहभाग नोंदवून स्पर्धा यशस्वी केली.

मध्यप्रदेश सरकारच्यावतीने ही मॅरेथॉन स्पर्धा पचमढीच्यादऱ्याखोऱ्यांच्यारस्त्यांवर आयोजित केलीहोती. या स्पर्धेत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर तथा सहकारी अशाएकूण१७सदस्यांनी सहभाग घेतलाहोता.यामध्ये रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचेस्पर्धक उत्तम डाखरेयांनी२१किलोमीटरच्यास्पर्धेत सहभाग नोंदविलाहोता. विशेष म्हणजे उत्तम डाखरेयांनी२१किलोमीटरचे अंतर विक्रमी वेळेत पार केले.यासाठीडाखरेयांनाआयोजकांनी पदक देवूनसन्मानीतकेले.त्याचबरोबर ५ किलोमीटरच्यामॅरेथॉनस्पर्धेत रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे अध्यक्ष अनुप यादव, सहसचिव मिलिंद बोडखे, मनिष बोराडे, राजेश गण्यारपवार, सुरज वाघ, अमोल धकाते, संदिप रामटेके, अविनाश रघुसेयांच्यासहइतरही सदस्य सहभागी झालेहोते.पाच किलोमीटर मॅरेथॉनस्पर्धेत यश मिळविल्याबद्दलस्पर्धेत सहभागी सर्व सदस्यांचा मेडल देवूनसन्मानकरण्यातआला. मनीष बोराडे व उत्तम डाखरेयांनी प्रकल्प संचालक म्हणून काम पाहिले. विशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्व सदस्य मागील एक महिन्यापासून सराव करितहोते.पचमढीमॅरेथॉन प्रकल्प पूर्णत: यशस्वी करूनदाखविल्याबद्दलसर्वांचे आभार आणिआयोजकांनी उत्तम व्यवस्थेसहपर्यटनाचा आनंद लुटला.स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना प्रमाणपत्र व मेडल देवूनसन्मानीतकरण्यातआल्याचीमाहिती प्रकल्प संचालक मनिषबोराडेयांनीदिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *