

मुल – आज नागपूर येथे .ना..सुधीरभाऊ मुनगंटीवार मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी मालधक्का बाबत दिलेले आश्वासन प्रमाणे रेल्वेचे अधिकारी यांचे सोबत हरिसींग सभाग्रृह नागपूर येथे मिटींग आयोजीत करविली . त्यात मूलचे सध्याचे सर्व जेष्ठ भाजपानेते व बचाव समीती व मार्निंग क्लब सदस्य हजर होते त्यात निर्माणधीन मालधक्का स्थानांतरण समस्या यावर विस्तृत महिती व इतर ठिकाणी हलविण्याबाबत चर्चा करण्यात आली . त्यात प्रामुख्याने मूलचे आरोग्य प्रदुषण व वाहतुक समस्या यांचे निराकरण करणेसाठी सूचविलेले वेगळे उपाय व योग्य पर्यायी सोयीयूक्त जागेची पाहणी करण्याकरिता रेल्वे विभाग एक नविन टेक्नीकल टिम व मूलचे भाजपा पदाधिकारी जिथे रेल्वे स्टेशन गावापासून / लोकवस्ती पासून दुर व हायवा ट्रक वाहतुक साठी सोयीचे राहील असे स्टेशन निवड करेल तो पर्यंत मूल मधील मालधक्का निर्माणधीन कार्य स्थगित राहील असे ठरले . याकरिता मार्निंग ग्रुप हे मागील ४ महिनेपासून सतत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व लोक प्रतिनिधी व संबधीत विभागाशी पाठपुरावा करित होते याकरिता स्थानीक भाजपा नेत्यामार्फत सारखे प्रयत्न सुरुच होते . मा . सुधीरभाऊ यांचेशी सतत सपर्क ठेवून तसेच समस्ये संबधी पाठपुरावा करून मूल क्षेत्रातील सर्व BJP दिग्गज नेत्यांनी भाऊंचा दिलेल्या शब्दास पूर्णत्वाकडे नेण्यास महत्वाची भूमिका पार पाडली . आणि मूल वासियां साठी सुटकेचा श्वास टाकण्याकरिता अथक परिश्रम घेतले कारण मूल मध्ये मालधक्का हटाव मोहीम जोर पकडत होती मोर्चा व अंदोलन सुरु झाल्याने प्रकरणाची गंभीरता वाढली होती .मा सुधीर भाऊंनी मूल नगराचे प्रति असलेल्या भावना व आपले क्षेत्राचे दायित्व ओळखून योग्य वेळी दखल घेतली व लवकर मार्ग काढला . संपूर्ण मूल मधील नागरीक , सामाजिक संघंटना यांनी मागणी केलेल्या आरोग्याशी व रहदारीशी निगडीत मालधक्का इतर ठिकाणी हलविण्याची जी महत्वाची कार्य “दिला शब्द केला पूर्ण ” या प्रमाणे पूर्ण करून मूलवासियांचे विश्वासात अधिक भर घातली याकरिता मार्णींग ग्रुप सदस्य व मूल शहर बचाव संघर्ष समितीचे सर्व सदस्य व नागरिकांनी पालक मंत्री यांचे आभार मानले आहे.



