चंद्रपुर जिल्हा

ब्रम्हपुरी तालुक्यातील जनतेचा कफ्र्यूला उत्तम प्रतिसाद ; रस्ते ओसाड

कोरोनाचा वाढता
प्रादुर्भाव कमी करण्यासाठी
राज्य सरकारने शुक्रवारी
राज्यातील १० महानगरे
पूर्णपणे लॉक डाऊन करण्याचा
निर्णय घेतला. त्याच
पाश्र्वभुमीवर नगर परिषद व
ग्रामपंचायत प्रशासनाने संपूर्ण
बाजारपेठ पुढील आदेशापर्यंत
बंद ठेवण्याचे निर्देश दिले.
त्यातच दि. २२ मार्च
सकाळपासूनच संपुर्ण देशात
जनता कफ्र्यूला पुकारण्यात
आले ब्रम्हपुरी व तालुक्यातील
जनतेने त्यास उत्स्पुâर्त प्रतिसाद
दिलेला आहे. व्यापारी
प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने
सर्व बंद ठेवण्यात आली
आहेत. भाजीबाजारासह
औषधांचेही दुकाने आज बंद
ठेवण्यात आल्याने रस्त्यावर
शुकशुकाट बघावयास मिळाले
. ब्रम्हपुरी येथील मुख्य
बाजारपेठ, शिवाजी चौक,
ख्रिस्तानंद चौक, सावरकर
चौक, परिसरातील रस्ते
निर्मनुष्य झाले असून मुख्य
रस्तावरील वाहतुकही
ओसरली आहे. गावखेड्यातही
चांगला प्रतिसाद मिळालेला
आहे. जनता कफ्र्यूला प्रतिसाद
द्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
देशवासीयांना संबोधित
करताना कोरोनाचा प्रादुर्भाव
रोखण्यासाठी रविवारी दि.२२
मार्च जनता का कफ्र्यू पाळण्याचे
आवाहन केले.
या आवाहनाला ब्रम्हपुरी
तसेच ग्रामीण भागातील
नागरिकांकडून चांगला
प्रतिसाद मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.