चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

बापूंचे विचार संपूर्ण जगाला अनंतकाळ मार्गदर्शक ठरतील-खास. बाळू धानोरकर

वरोरा : 30 जानेवा0री 1948 हा दिवस भारतीय इतिहासातील काळा अध्याय म्हणून नोंदवला गेला आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नायक राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना गोळ्या घातल्या. मात्र महात्मा गांधींनी दिलेले विचार आजही प्रेरणादायी आहेत. सत्य आणि अहिंसेचे विचार भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अनंतकाळ मार्गदर्शक ठरतील, असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वरोऱ्यातील गांधी चौकातील पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर खासदार बाळू धानोरकर बोलत होते. यावेळी आमदार प्रतिभा धानोरकर यांनीही मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, माजी नगरसेवक राजू महाजन, प्रदीप बुराण, तालुका सचिव मनोहर स्वामी, महिला तालुकाध्यक्षा रत्ना अहिरकर, महिला शहराध्यक्ष दिपाली माटे, शिरोमणी स्वामी, माजी पालीका उपाध्यक्ष अनिल झोटिंग, निलेश भालेराव, सलीम पटेल, राहुल देवडे, शिरोमणी स्वामी, सरपंच ऐश्वर्या खामणकर, विजय पुरी, प्रमोद काळे, राहील पटेल, बाळु पिसाळ, शशी चौधरी, पराग नरडे, मनिष जयस्वाल, अमोल सेलकर, हरिभाऊ भाजीपाले यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.