
ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी येथील कोट तलावामध्ये देवी विसर्जनादरम्यान इसमाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ८ ऑक्टोंबरला पहाटे तीन वाजता च्या दरम्यान घडली.
विशाल गणपत चाचरकर वय ४३ राहणार भवानी वॉर्ड ब्रह्मपुरी असे मृतक इसमाचे नाव आहे. नवरात्रीनिमित्त ब्रह्मपुरी शहरातील विविध मंडळांनी दुर्गा, शारदा देवींच्या मूर्तीची स्थापना केली नऊ दिवस मोठ्या थाटामाटात नवरात्र उत्सव साजरा
करण्यात आला. काल दिनांक ७ ऑक्टोबरला देवींची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली व रात्री उशिरापर्यंत पोलीस स्टेशन ब्रह्मपुरी समोरील कोट तलावामध्ये
विसर्जन करण्यात आले. ८ ऑक्टोंबर ला पहाटे तीन वाजता च्या दरम्यान देवीचे विसर्जन करताना विशाल चाचरकर या इसमाचा तलावात बुडून मृत्यू झाला.
मृतकाचे पश्चात पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. सदर मृतदेह ब्रह्मपुरी पोलिसांनी ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालय येथे उत्तरिय तपासणी करिता पाठवले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




