चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघालेल्या शोभायात्रेचे आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

जश्ने–ईद-ए-मिलादुन्नबी निमित्य मकरजी सिरतुन्नबी कमेटीच्या वतीने शहराच्या मुख्य मार्गाने काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे छोटा बाजार चैचौकात आमदार किशोर जोरगेवार यांनी भव्य स्वागत केले. यावेळी आ. जोरगेवार यांनी शोभायात्रेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मौलाना यांचे पुष्पहारशाल देऊन स्वागत केले तसेच सर्व मुस्लीम बांधवांना जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षी प्रमाणे यंदा हि मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जश्ने-ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात सजारी करण्यात आली. या निमित्त शहरातुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. कोहिनूर तलाव जवळून निघालेली ही शोभायात्रा शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्त झाली. सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने छोटा बाजार चौक येथे मंच उभारला होता. शोभायात्रा येथे पोहचताच सदर मंचावरून आमदार किशोर जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहराध्यक्ष राशेद हुसेनअल्प संख्याक विभागाचे युवा नेते इमरान खानयंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारपअसलम खानजावेद शेखऐजाज शेखशादाब शेखरेहान शेखऐजाज खानसोहैब शेखजोसेफ शेखरफिक खानविलास वनकरआशिम खानहेरमन जोसेफ अबरार सय्यद,  इरफान खान उमेर अन्सारी आदिंची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published.