
चंद्रपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर रामनगर पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तंबाखू फ्लेवर असलेली सिगरेट पोलिसांनी जप्त केली. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातून दोन दुकानांमधून मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.
या सिगरेट चा वापर अल्पवयीन मुलांसाठी केला जातो या सिगरेटच्या माध्यमातून कोणतीही दुर्गंधी येत नसल्याने पालकांना देखील शंका येत नाही. अशा सिगरेटच्या आहारी पाल्य जाऊ नये, यासाठी पालकांना पालकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन देखील रामनगर पोलिसांनी केले आहे.




