चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

चंद्रपूर व वरोऱ्यात कांग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

चंद्रपूर : लोकशाहीप्रधान देशात सत्ताधारी आणि विरोधक यांना तेवढेच महत्वाचे स्थान आहे. परंतु, देशात सध्या सत्तेत असलेल्या मोदी सरकारला विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही. यातून विरोधी पक्षातील नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचले जात आहे.

त्यासाठी मोदी सरकार केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केला. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्त वसुली संचालनालय (ईडी) वतीने चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे. त्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीने शांततापूर्ण सत्याग्रह करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार चंद्रपूर शहर जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने मंगळवारी (ता. २६) सकाळी ११ वाजता शहरातील गांधी चौकातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी श्री. तिवारी बोलत होते.  तत्पूर्वी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून दडपशाही करीत असून, काँग्रेसला झुकवू पाहात आहे. परंतु, ते शक्य नाही. ७५ वर्षांच्या एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाला केंद्र सरकार माणुसकीशून्य पद्धतीने त्रास देत आहे. सत्तेचा अहंकार चढलेल्या भाजपला देशात विरोधी पक्षांचे अस्तित्व मान्य नाही. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून नेत्यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान रचत आहे. लोकशाही देशात ही अघोषित हुकूमशाही सुरू असून मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात हे आंदोलन आहे. या आंदोलनातून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येत असल्याचे उपस्थित अन्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी यांना सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीसाठी आज पुन्हा बोलविले होते. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. चंद्रपुरातही काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. या आंदोलनात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. के. सिंग, घनश्याम मुलचंदानी, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष संगीताताई अमृतकर यांच्यासह चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, एनएसयुआय, अनुसूचित जाती विभाग, ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभागासह अन्य विभाग व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  वरोरा : महागाई, बेरोजगारी देशात वाढत आहे, देशातील स्वायत्त संस्था नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने विकायला काढलेल्या आहेत. भाजपने सर्वसामान्य जनतेवर अन्याय कारक Gst लादला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.