
चंद्रपूर (का.प्र.) चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहे. त्यामुळे कैद्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पाश्र्वभूमीवर गडचिरोली येथील तयार असलेले जिल्हा कारागृह सुरू करण्याची मागणी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे. चंद्रपूर येथे जिल्हा कारागृह आहे. या कारागृहातील कैद्यांची क्षमता ३३० इतकी आहे. मात्र, या ठिकाणी दुप्पट कैदी वास्तव्यास आहे. ही अवस्था नेहमीच असते. त्यामुळे कैद्यांच्या राहण्याची, खाण्याची आणि अन्य बाबींची अडचण सातत्याने भासते. जिल्हा कारागृहात कर्मचाèयांचीही वानवा आहे. त्यामुळे कार्यरत कर्मचाèयांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. जिल्हा कारागृहातील कर्मचाèयांचीही संख्याही वाढविणे गरजेचे आहे.
गडचिरोली येथील जिल्हा कारागृह कित्येक वर्षांपासून तयार आहे. तेथील जिल्हा पोलिसअधीक्षकांनी सुरक्षेचे कारण समोर करून तेथील कारागृह अद्याप सुरू केले नसल्याचे समजते. दारू, इतर किरकोळ गुन्ह्यातील कैदी, कच्चै कैदी जर गडचिरोली येथील जिल्हा कारागृहात वळते केल्यास चंद्रपूर जिल्हा कारागृहाचा भार कमी होई शकेल. या सर्व गोष्टींचा विचार करून गडचिरोली येथील जिल्हा कारागृह सुरू करावे, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे



