चंद्रपूर(का.प्र ): कोरोनाची वाढती रुगसंख्या जिल्ह्यात झपाट्याने वाढत असली तरी यात बरे होण्याचे प्रमाणही ५०% च्या वर आहे हि दिलासादायक बाब म्हणावी लागेल. व संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूरचा मृत्युदर मात्र शून्य आहे. हि दिलासादायक बाब चंद्रपूरसाठी आहे. तरीही कोरोनावर आणखी नियंत्रण यावे म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांनी ४ दिवसाचे संपूर्ण संचारबंदी लागू केली आहे. जेणेकरून कोरोनाचे वाढते प्रमाण कमी व्हावे. चंद्रपुरात काही रुग्ण धोकादायक स्थितीत उपचारादरम्यान पोहोचले होते. मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे, योग्य उपचारामुळे मृत्यूच्या दारातून परत येण्यात त्यांना यश मिळाले आहे. म्हणूनच आज चंद्रपूरचा मृत्युदर शून्य आहे.




