चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

एस टी बस ला अम्बुलन्सची धडक.

दोन्ही वाहन चालकावर गुन्हे दाखल.

नागभिड येथील टी पॉइंट चौकात गडचिरोली येथून नागपूर येथे खाजगी अंब्युलास टी पॉइंट चौकात येताच सिंदेवाही ते नागपूर जाणारी एस टी बस चौकात येताच अंबुलस चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात घडला मात्र जीवित हानी झाली नाहीं ही घटना आज ३ वाजता घडली. नागभिड येथे घटना स्थळी नागभिड पोलीस दाखल झाल्यानंतर दोन्ही वाहने पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले. अंबुलास येथील रुग्णांना दुसऱ्या वाहनाने पाठविण्यात आले. खाजगी अंबुलास ही गडचिरोली येथील शीतल सचिन जमावांदिकर यांच्या मालकीची असून चालक नरेश सोरते हा वाहन चालवीत होता तर बस चालक ब्रम्हपुरी आगारातील असून चालक विलेश पटेल असून दोन्ही वाहनावर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस स्टेशन नागभिड येथील ठाणेदार मेंढे  यांच्या आदेशानुसार सह पोलीस निरीक्षक बहादूरे पुढील तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *