चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अनियंत्रित ट्रकची 4 ते 5 दुचाकीला धडक

चंद्रपूर – शहरातील वाहतूक नियंत्रक शाळेजवळ आज 19 ऑक्टोम्बरला रात्री 10 वाजताच्या सुमारास लाकडाने भरलेल्या अनियंत्रित ट्रक ने मार्गावर असलेल्या 4 ते 5 दुचाकी वाहनाला धडक दिली. वरोरा नाका उड्डाणपुलावरून शहराकडे येत असणाऱ्या ट्रक क्रमांक MH34M5402 ने रस्त्याच्या कडेला काही नागरिक दुचाकीवर बसून होते, अचानक अनियंत्रित ट्रक त्यांच्या वाहनाजवळ सुसाट आला. अचानक आलेल्या अनियंत्रित ट्रक बघता नागरिक बाजूला झाले, मात्र ट्रक ने तब्बल 4 ते 5 दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.
विशेष म्हणजे हा अपघात काही अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेच्या कार्यालयाजवळ झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.