

मुल – जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ इंडिया ची इंटर डोजो कराटे चॅम्पियनशिप 2023 चे आयोजन शनिवार 10 जून रोजी डिस्ट्रिक्ट कराटे-डो असोसिएशन चंद्रपूर द्वारे फिट-टू-फाईट्स मार्शल आर्टस् अकॅडमी,चंद्रपूर मध्ये केले होते. ह्या स्पर्धेत नागपूर विभाग व इतर संलग्न जिल्ह्यापैकी चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यातील असोसिएशन ला संलग्न असेलेले क्लब/अकॅडमी सहभागी झाले होते या स्पर्धेमध्ये मूल मधून कराटे अँड फिटनेस क्लब चे संचालक-मुख्य प्रशिक्षक इम्रान खान आणि निलेश गेडाम यांच्या मार्गदर्शनात तयार झालेले मूल शहरातील एकूण 27 कराटे खेळाडूंचा सहभाग होता
स्पर्धेत 10 वर्ष आतील वयोगटात कुमिते आणि काता प्रकारात मध्ये दिग्वि रायपुरे हिने अनुक्रमे रजत आणि सुवर्ण,वैष्णवी मानकर 1 सुवर्ण आणि 1 रजत, मेहेर कुकडे ने रजत आणि कांस्य, स्वराज पिसाळ ने रजत आणि कांस्य, विराज पिसाळ ने कांस्य,आणि सचित मांदाडे ने कांस्य पदक जिंकले.14 वर्ष आतील वयोगटात (मुली) आपापल्या वजनगटात प्रीति भंडारी ने 2 सुवर्ण पदक,परी नन्नावरे 2 कांस्य,अनुष्का येरमे 1 सुवर्ण आणि 1 कांस्य,,श्रीजा सहारे ने 2 सुवर्ण,श्रेया झाडे ने 2 रजत,यशस्वी येनुगवार ने 1 कांस्य आणि 1 सुवर्ण,अनन्या बोमनवार 2 कांस्य ,प्रणाली झरकर 2 रजत,गुंजन दुर्गे 1 सुवर्ण पदक जिंकले. 14 वर्ष आतील वयोगटात (मुले) आपापल्या वजनगटात क्रीष्णा शेंडे ने रजत,रुद्र सोयम 2 कांस्य,प्रीतिश आलम ने 1 रजत आणि 1 कांस्य,प्रेम नरड़ ने 2 सुवर्ण,शौर्य खरडीवार ने एक सुवर्ण,यश कालगटवार ने 2 सुवर्ण ,अंशुल निमसरकर ने 1 रजत आणि 1 सुवर्ण पदक जिंकले.17 वर्ष वयोगट मुलींमध्ये आपापल्या वजनगटात हर्षिता आयलनवर 2 कांस्य,दिव्या नरड़ 2 सुवर्ण,सिमरन खोब्रागडे 1 सुवर्ण पदक जिंकले तसेच 17 वर्ष आतील मुलांच्या वयोगटात आपापल्या वजनगटात नैतिक धोबे 2 सुवर्ण,मीत खोब्रागडे 2 रजत पदक अशे मूलच्या खात्यात एकूण 20 सुवर्ण 13 रजत आणि 14 कांस्य पदक आलेले आहेत ह्या सोबतच स्पर्धेच्या पदकतालिकेत कराटे अँड फिटनेस क्लब मूल ला द्वितीय स्थानाच्या ट्रॉफी ने सन्मानित केले गेले.ही सम्पूर्ण स्पर्धा जुंसेई शोतोकान कराटे असोसिएशन चे राष्ट्रीय प्रमुख शिहान विनय बोढे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.विजयी खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा देत आशीर्वाद दिले आहे.स्पर्धेमध्ये क्लब चे सहप्रशिक्षक साक्षी गुरनुले, अमान खान आणि साहिल खान ह्यांचा ही मोलाचा वाटा राहिला आहे.



