चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत चंद्रपूरच्या संघर्ष आवळे ची उत्तुंग कामगिरी

भद्रावती –  एलबीएचएम चेस फेस्टिव्हल २०२३ पुणे द्वारा आयोजित राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत चंद्रपूर च्या संघर्ष आवळेने उत्तुंग कामगिरी केली असून त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
 ध्रुव ग्लोबल स्कूल उंदरी, पुणे येथे दि.१३ ते १७ मे दरम्यान आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत भारतातील एकूण ४६३ नामांकित बुद्धीबळ पटूंनी सहभाग नोंदवला होता.
या स्पर्धेत चंद्रपुर जिल्ह्यातील बुद्धीबळ क्रीडा प्रकारातील गौरव लिटल मास्टर संघर्ष अनिल आवळे ( वय १८ वर्ष ) याने राष्ट्रीय बुद्धीबळ चषकासह ५० हजार रुपये रोख रक्कम जिंकून  १३०० गुणांकन गटातून तिसरे स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत एकूण ९ राउंड खेळण्यात आलेले असुन अखेरच्या ९ व्या राऊंड मध्ये गुजरात च्या निविद राणा खेळाडू वर विजयश्री प्राप्त करीत  ६ गुणांसह मास्टर संघर्ष अनिल आवळेने हे उल्लेखनीय यश प्राप्त केलेले आहे.
      या स्पर्धेत मास्टर संघर्ष च्या अटॅक च्या चालीने अनेकांना आश्चर्य चकित केले.मास्टर संघर्ष हा चंद्रपुर जिल्ह्यातील नंबर वन चेस अकादमी – एस आर जे चेस अकादमी चे डायरेक्टर व अमेचुर बुद्धीबळ असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे सहसचिव  सुरज राजकुमार जयस्वाल  यांच्या चेंस कोचिंग अकादमी चा सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहे.
मास्टर संघर्ष अनिल आवळे यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व प्रशिक्षक सूरज जयस्वाल यांना दिले आहे.संघर्ष याच्या या ऐतिहासिक विजया करीता जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, अमेचुर बुद्धीबळ असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष  पांडुरंग आंबटकर, कोषाध्यक्ष प्रा. दुष्यंत नगराळे, उपाध्यक्ष  वाल्मिक खोब्रागडे, अमेचुर बुद्धीबळ असोसिएशनचे संस्थापक व सचिव दुर्गराज रामटेके, जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष गयनेवर, एलन थिलक कराटे स्कूल चंद्रपुर चे जिल्हा अध्यक्ष डॉ अंकुश आगलावे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चे अधिकारी विनोद ठिकरे, विजय ढोबळे,  राजु वडते, संदीप उईके, बंडू करमनकर, बंडू रामटेके, अतुल कोल्हे, संदीप पंधरे, सुनील गायकवाड, दीपक पाटील, डॉ. संघपाल नारनवरे, करण डोंगरे  यांनी तसेच जिल्ह्यातील सर्व प्रमुख बुद्धीबळ प्रेमींनी मास्टर संघर्ष च्य या अभूतपूर्व व ऐतिहासिक यशासाठी अभिनंदनाचा वर्षाव केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *