चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

वाहन चालकांच्या समस्या संदर्भात गडचांदूर ते चंद्रपूर बाईक रॅली

गडचांदूर- रस्त्यावर चालणाऱ्या वाहन चालकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. याच समस्या घेवुन अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या वतीने गडचांदूर ते चंद्रपूर अशी मोटारसायकल रॅली काढुन जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
वाहन चालकांच्या आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, व आरोग्य विषयक समस्या ची जान ठेवुन अनैशा वाहन चालक कामगार संघटनेच्या माध्यमातून शासन दरबारी मागण्या रेटून वाहन चालकांच्या समस्या सुटाव्यात या उदात्त हेतूने काल दिनांक ९ मे २०२३ रोजी गडचांदूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर अशी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यालाअनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे यांच्या हस्ते माल्यार्पण करुन या रॅलीची सुरवात करण्यात आली. वाहन चालकांना देशाचा दुसरा सैनिक म्हणून मान्यता देण्यात यावी, वाहनाचे अधिक भार बंद करण्यात यावे, अपघातात मृत्यु झालेल्या वाहन चालकांच्या परिवारास पेंशन, विमा स्वरुपात विस लाख रुपये मिळण्यात यावे, शारीरिक अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये शासनाने द्यावे,अपघात दरम्यान पाच लाख पर्यंत मोफत उपचार करण्यात यावा, वाहन चालकांच्या मृत्यू पश्चात दोन अपत्यांना विना मुल्य शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात यावी, वाहन चालकाचे मासीक वेतन निर्धारित करण्यात यावे व काळानुसार बदलाव करण्यात यावा, वाहन चालकांना वयाच्या ५८ वर्षे नंतर पेंशन लागु करण्यात यावे, अशा विविध मागण्यांना घेवुन ही मोटारसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरज उपरे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे हे प्रामुख्याने उपस्थित होते. तर
उपस्थिति मध्ये संघटना महासचिव कमलेश राऊत, जिल्हा संघटक अनंता रामटेके, उपाध्यक्ष बाळुभाऊ रामटेके, सचिव संतोष वाघमारे, कोषाध्यक्ष अनिल चिलमुले, सूरज चाल,कार्यकारी सदस्य हनुमान रामुलवार, नितेश रामुलवार,मुक्तेश्वर बारसागडे, मोतीराम दोब्बला, महेंद्र वैरागड़े, अमोल वरवाडे, सत्त्यपाल गौरकर, उसमान शेख, सूरज राजपूत,मुरलिभाऊ खंडागडे, दिनेश वाघमारे, अश्वजीत मेश्राम, आशिक मेश्राम, श्रीकांत नन्नावरे, रंजीत भानारकर, मोरेश्वर चुनारकर, विनोद चुनारकर, सुधीर राऊत, फिरोज शेख,आकाश ताकसांडे, उमाकांत वाघमारे, गणेश वाघमारे, सुरेश वाघमारे, शांताराम गेडाम, प्रदीप टेकाम,संजय साळवे, यांनी अथक परिश्रम घेवुन मोटारसायकल रॅली यशस्वी केली या प्रसंगी अनैशा वाहन चालक कामगार संघटना च्या वतीने सर्वांचे आभार मानले,
,,फोटो,,

Leave a Reply

Your email address will not be published.