चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक

चंद्रपूर :- चंद्रपूर शहरात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवून दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगारास रामनगर पोलिसांनी पथके तयार करून मोठ्या शिताफीने वर्धा जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून 165,350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. Chain Snacker Criminal सुरज श्रीराम शेट्टी (कोरवन) असे कुख्यात आरोपीचे नाव असून आरोपीवर तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यात घरफोडी चे 16 गुन्हे तर नागपूर व आदीलाबाद येथे चैन स्नॅचिंग चे अनेक गुन्हे दाखल आहेत. चंद्रपूर शहरातील गुलमोहर कॉलनीतील महिला दिनांक 1 एप्रिल रोजी रात्रो 9 वाजता कामावरून घरी जात असतांना पांढऱ्या रंगाच्या दुचाकीवरून येणाऱ्या इसमाने गळ्यातील मंगळसूत्र पळविले, त्याच्याच दुसऱ्या दिवशी 2 एप्रिल ला सिस्टर कॉलनीतील महिला आपल्या पतीसह पहाटे 5-30 वाजता मॉर्निंग करत असताना पांढऱ्या रंगाच्या दुचाकीस्वारानी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला त्यानंतर पुन्हा 6 एप्रिल ला रेव्हेन्यू कॉलनीतील पती – पत्नी मोपेड वाहनाने पहाटे 5-30 वाजता मंदीरात जात असतांना पांढऱ्या रंगाच्या दुचाकीस्वाराने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरदस्तिने हिसकावून नेले असल्याच्या तीन तक्रारी रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. Serial Crime वारंवार होणाऱ्या चैन स्नॅचिंग गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक रामनगर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण पथकाचे तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले. सतत 7 ते 8 दिवस पहाटे 4 ते 7 वाजतापर्यंत शहरातील प्रवेशद्वार असलेल्या ठिकाणी सापळा रचून साध्या पोषाखात पाळत ठेवण्यात आली. Ramnagar Police Station
त्यावरून दिनांक 14 एप्रिल रोजी पठाणपुरा मार्गावरून पांढऱ्या रंगाचे वाहनाने हेल्मेट लावून शहरात प्रवेश केल्याची गोपनीय माहिती रामनगर गुन्हे अन्वेषण पोलिसांना प्राप्त होताच तपास सुरू करण्यात आला यादरम्यान आरोपी एमआयडीसी पडोली मार्गाने भरधाव वेगाने जात असतांना सपोनि हर्षल एकरे यांनी पोलिसांच्या चारचाकी वाहनाने आरोपीच्या वाहनाला मागून हलकी धडक दिली त्यात तो रोडखाली पडला, अंधाराचा फायदा घेत ताराच्या कुंपणातून पळून जातांना सपोनि एकरे व नापोशी किशोर वैरागडे यांनी फिल्मी स्टाइलने पाठलाग केला परंतु आरोपी पळुन जाण्यात यशस्वी झाला यावेळी एमआयडीसी जंगलात पाहणी केली दरम्यान त्याचे कपडे आढळले त्यात मिरची पावडर ची पूड आढळली. आरोपीचे हेल्मेट व दुचाकी वाहन ताब्यात घेण्यात आले.  दुचाकी वाहनावरून प्राप्त माहितीनुसार पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनात पथक तयार करून पोऊनी सामलवार सह आंध्रप्रदेश, तेलंगाणा जाऊन आरोपी विषयी माहिती प्राप्त केली त्यानंतर पोलिसांना आरोपी वर्धा जिल्ह्यातील वर्धा शहरातील शांतीनगर परिसरातील तिरुपती अपार्टमेंट येथे असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच त्याचे घरी गेले असता पोलिसांना पाहून तिथे असल्याने महिलेने घरातील लाईट बंद करून आरडाओरड केली त्यावेळी सपोनि सामलावार यांनी स्थानिक पोलीस स्टाफ च्या साहाय्याने घरात प्रवेश केला असता आरोपी सूरज श्रीराम शेट्टी (कोरवन) आढळून आला त्याला ताब्यात घेत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. Wardha आरोपी कडुन पंचनामा कलम २७ भा.पु.का. प्रमाणे त्यांचे कडुन एक सोन्याचे मंगळसूत्र दुपदरी काळे मणी व पदकासहीत असलेले वजन अंदाजे २६.४००/- रूपये ग्रॅम कि.अं. ७६,५६०/-रूपये एक सोन्याची चैन वजन अंदाजे ४.५ ग्रॅम कि.अं. २०,०००/- रूपये, एक सोन्याचे मंगळसुत्र (काळी पोत) अंदाजे वजन २० ग्रॅम कि.अं. ४०,०००/-रू असा एकुण १,३६,५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.सदर कार्यवाही पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, उपविभागिय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस, निरीक्षक राजेश मुळे, मपोनि लता वाढीवे, सपोनि हर्षल ओकरे, पोउपनि विनोद भुरले, पोउपनि मधुकर सामलवार, पो.हवा. रजनीकांत पुट्ठावार, प्रशांत शेंदरे, विनोद यादव, किशारे वैरागडे, चिकाटे, मिलींद दोडके, आनंद खरात, निलेश मुडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, हिरालाल गुप्ता, संदिप कामडी, विकास जाधव, भावना रामटेके तसेच सायबर सेल, चंद्रपुर येथील प्रशांत लारोकर, छगन जांभुळे, अमोल सावे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *