चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावे, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आले असून त्या कामांचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
तालुक्यातील शेबळ, तुळाणा, मार्डा, नांद्रा, लोणगाडगा, माढेळी, वडगाव, येवती, वाघनख, महाडोळी, शेगाव, नागरी, खांबाडा, टेमुर्डा, येन्सा, चिनोरा, मोहबाळा या गावात जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून कामांना मंजुरी मिळाली आहे.
भूमिपूजन सोहळ्यात याप्रसंगी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जि. प. चंद्रपूरचे कार्यकारी अभियंता बोहरे, उपविभागीय अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा चिमूरचे हेडाऊ, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग चिमूरचे कनिष्ठ अभियंता बांबोडे, मिलिंद भोयर, राजेंद्र चिकटे माजी सभापती कृ. उ. बा. स. वरोरा , सुनंदा जिवतोडे माजी जि. प.. सदस्य , विद्या किलनाके माजी जि. प. सदस्य, संजीवनी भोयर माजी उपसभापती पं. स. वरोरा , प्रफुल आसूटकर, प्रमोद मगरे, मनोज चिंचोलकर, राजु वाभिटकर, इस्तेखा पठाण, अंबादास टोंगे तसेच संबंधित सर्व ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सचिव, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.
ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने गावकऱ्यांच्या तहानेचा प्रश्न आता सुटेल. शिवाय शुद्ध पाणी मिळेल, अशी आशा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.