चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

शिक्षकेत्तर कर्मचारी संघटने अंतर्गत एक दिवसीय राज्यव्यापी बंद आंदोलन

चंद्रपुर :- महाविद्यालयीन व विद्यापिठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध टप्यात सूरू असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या चवथ्या टप्यात आज दिनांक १६ फेब्रुवारीला एक दिवसीय राज्यव्यापी बंद आंदोलनात चंद्रपूर गडचिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटने अंतर्गत संलग्नित जनता महाविद्यालय चंद्रपूर येथील संपुर्ण शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी संपात सहभाग घेवून संप यशस्वी केला.  कर्मचा-यांना सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुर्नजिवित करणे, कर्मचा-यांना १०/२०/३० लाभाची योजना शिक्षकेत्तर व विद्यापिठीय कर्मचा- यांना लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, सातव्या वेतन आयोग फरकाची थकबाकी इत्यादि अनेक मागण्यांना घेवून हा संप पुकारण्यात आलेला असून मागण्या मान्य न झाल्यास २० फेब्रुवारी २०२३ पासून बेमुदत संप होणार आहे. या एक दिवसीय राज्यव्यापी संपात जनता महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष, मा सुर्यभान कन्नाके, सचिव विवेक आवळे, जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई व प्रबंधक दिनकर अडबाले यांनी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कर्मचा-यांच्या संविधानिक मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेण्यात येतील या विश्वासासह या संपात सहभागाची घोषणा केली. यावेळी जनता महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुर्यभान कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई, कृती समितीतील सदस्य सचिन सुरवाडे, सभासद नरसिम्हा बादावत, निर्दोष दहिवले, नंदकिशोर पाहूणे, नंदकिशोर निखार, अधिक्षक अरविंद धांदे, जयेश बेले, ऋषांत टिपले, विप्रा पाटिल यांनी सभेसमोर मनोगत व्यक्त करत विविध विषयांवर मार्गदर्शन केले. या संपाच्या ठिकाणी MFUCTO महाराष्ट्र संघटनेचे प्रा. प्रेमदास बोरकर, प्रा. मनुरे व प्रा. योगेश्वर दूधपचारे यांनी भेट देवून कर्मचान्यांना मार्गदर्शन केले व आपल्या संघटनेचा पाठींबा या संपाला जाहीर | केला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. सुभाष सर यांनी कर्मचा-याना भेट देत संपास प्रिन्सिपल फोरमचा पाठिंबा जाहीर केला. तसेच वरीष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आशिष महातळे व सौ. कविता रंगारी व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कर्मचा-यांची भेट घेतली. दोन सत्रात चाललेल्या या संप सभेचे संचालन श्रीमती योगिता रायपूरे व श्री विवेक आवळे यांनी तर आभार अरूण भुसारी व नंदकिशोर पाहुणे यांनी केले. महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी वेधक घोषणा देत या संपाकडे शासन व प्रशाशनाचे लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published.