चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

मच्छीपालन केंद्रात आढळली मगर

 

घुग्घुस गावाच्या मोठ्या तलावाला लागून असलेल्या एका मच्छीपालन केंद्रात भला मोठा मगर दिसून आला. त्याला बाहेर काढण्याकरिता रॅपिड रिस्पान्स युनिटला पाचारण केले असता हे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मगराला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. गुरुवारी सकाळी मगराला बाहेर काढण्यात आले. मच्छीपालन केंद्रात मगर आढळल्याने नागरिकांनी गर्दी केली. वेकोलिच्या मालकीचा घुग्घुस गावाच्या लोकसाहतीला लागून तलाव आहे. त्यालाच लागून बंडू झाडे यांचे घर आहे. त्या ठिकाणी शेततळ्यासारखा एक तलाव करून मच्छी पालन केंद्र सुरू केले आहे. या मच्छीपालन केंद्रात बुधवारी सायंकाळी भला मोठा मगर आढळून आला. मगर आल्याचे वृत्त वाऱ्यासारखे गावात पसरताच बघ्यांची गर्दी उसळली.. दरम्यान या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता वन विभागाने तत्काळ दखल घेत रेस्क्यू चमू घटनास्थळी पाठविली. केंद्र पाणी अधिक असल्याने पाणी काढण्यात आले. त्यानंतर मगराला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.