

बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदेश कमेटी च्या निर्देशानुसार शहर काँग्रेस कमेटी तर्फे जिल्ह्यातील आमदारांच्या उपस्थित तिरंगा यात्रा काढण्यात आली. ” याद करो कुर्बानी हे घोषवाक्य घेऊन तिरंगा यात्रेची सुरुवात शहरातील वस्ती विभागातून करण्यात आली.यात माजी पालक मंत्री आमदार विजय वडेट्टीवार,राजुरा चे आमदार सुभाष धोटे,वरोरा चे आमदार प्रतिभा धानोरकर,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे,नंदू नागरकर,घनश्याम मुलचंदानी इत्यादी भर पावसात पदयात्रेत सामील झाले.यावेळी आयोजित सभेत पुढाऱ्यांनी मार्गदर्शन करताना म्हटले की,देशाला इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी बलिदान दिले.व हा देश स्वातंत्र केला. यावेळी शहर काँग्रेस कमेटी चे अब्दुल करीम,माजी नगराध्यक्ष छाया मडावी,सुनंदा आत्राम,डॉ.मधुकर बावने,देवेंद्र आर्य,भास्कर माकोडे,विनोद बुटले,वेंकटेश बाल बैरय्या,ताहीर हुसेन,इस्माईल ढाकवाला,नरेश मुंदडा,जावेद सिद्दीकी,रेखा रामटेके,डॉ.अनिल वाढई,डॉ.भटारकर,पवन मेश्राम,निशांत आत्राम,अफसाना सय्यद,रोजीद ताजुद्दीन,राजू बहुरिया,मीना बहुरिया,वर्षा दानव,डॉ.सुनिल कुलदीवार,विल्सन बोज्जा,शोभा महतो,आनंद विरय्या,डेविड कामपेल्ली,सुरेश चौधरी,रवी मातंगी,सत्यशीला साळवे,लता घुंगरूटकर,सादिकभाई,तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.,



