चंद्रपुर चंद्रपुर जिल्हा

अवैध गोवंशाची तस्करी करणारे दोन वाहने जप्त 2 वाहनांसह 5 आरोपींना अटक

चंद्रपूर :– जनावरांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती वरून उमरी पोतदार पोलीसांनी गस्त लावून वाहन तपासली असता 2 आयशर वाहनात 35 जनावरे आढळून आले असून त्यातील 2 जनावरे मृत अवस्थेत आढळली असून 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक 5 जुलै रोजी सकाळी सात ते आठच्या दरम्यान नागभीड वरून अवैद्य जनावराचे आयशर ट्रक तोहोगाव मार्गे आंध्रा – तेलंगाना जाणारे दोन आयशर ट्रक पोंभूर्णा तालुक्यातील उमरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत डोंगर हळदी ते आंबे धानोरा रोडवर अवैद्य ट्रकला अडवुन वाहन क्रमांक TS – 20 – T 6732 व TS – 20 – T 6312 असे दोन आयशर ट्रक पकडण्यात आले, वाहन चालक वसंत राऊत आणि दुसरे वाहन चालक जावेद पठाण असे दोन चालक व त्यांच्या साथीला तीन जण विनोद मोरांडे, पवन अमृतकर व बशीर शेख यांना ताब्यात घेतले असून 23 लाख 66 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत प्रतिबंधक कारवाई करून मुद्देमाला सहित आरोपिंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर कारवाई उमरी पोतदार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेरकी यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.